IND vs ENG: राहुल आणि जडेजा विशाखापट्टणम कसोटीमधून बाहेर, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

WhatsApp Group

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्यानंतर संघाला सलग अनेक धक्के बसले. प्रथम जसप्रीत बुमराहला आयसीसीने फटकारले आणि शिक्षा सुनावली. त्यानंतर टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुलही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले. विशेष म्हणजे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहली आधीच संघाबाहेर आहे. म्हणजेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी डोकेदुखी वाढली आहे.

कोणाला मिळाली संधी?

जडेजा आणि राहुलला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. आता ज्याचा संघात समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ते नाव आहे सरफराज खान ज्याने भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध चमकदार कामगिरी केली. राहुलच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली. रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळाले. याशिवाय आवेश खानही रणजी संघात राहणार असून त्याच्या जागी सौरभ कुमारची निवड करण्यात आली आहे.

जडेजा आणि राहुल संघातून बाहेर का?

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलला मांडीत दुखत असल्याची तक्रार आहे आणि त्यामुळे तो 2 फेब्रुवारीपासून होणाऱ्या विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर राहणार आहे. याशिवाय रविवारी हैदराबाद कसोटीत रवींद्र जडेजा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा बळी ठरला होता. दुसऱ्या डावात धावा घेताना जडेजा जखमी झाला आणि त्यामुळे तो धावबादही झाला. आता हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या कसोटीपर्यंत परततात की नाही याविषयी आगामी अपडेटची प्रतीक्षा केली जाईल.

टीम इंडियाचा नवा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराजन , मुकेश कुमार, सौरभ कुमार.

हेही वाचा