Viral Video: बापरे! अंगावर साप गुंडाळून व्हिडिओ बनवत होती तरुणी, पुढे काय झालं पहा…

WhatsApp Group

आजकाल लोकांना सोशल मीडियाचे एक वेगळेच व्यसन लागले आहे. व्ह्यूज, लाईक्स आणि व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यासाठी काही लोक असे काम करतात की त्यांना पाहून सगळेच थक्क होतात. पण हीच गोष्ट त्यांना प्रसिद्धही बनवते, त्यामुळे जीव धोक्यात घालणे लोक चुकीचे मानत नाहीत. असाच एक धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी सापासोबत व्हिडिओ बनवताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मुलीने तिच्या संपूर्ण शरीराभोवती साप गुंडाळलेला आहे. मुलगी सापाला अजिबात घाबरत नाही. तिचा फोन काढून आरशात दाखवून ती सापासोबत स्वतःचा व्हिडिओ बनवत आहे. साप मुलीच्या शरीराभोवती गुंडाळलेला आहे जो खूपच धोकादायक दिसत आहे. मुलीला सापापासून अजिबात धोका वाटत नाही. ती आरामात सापासोबत व्हिडिओ बनवत आहे.

विराट कोहलीवर ‘या’ क्रिकेटपटूने लावले धक्कादायक आरोप! म्हणाला- कोहली माझ्यावर थुंकला…

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया 

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक म्हणतात की हा साप विषारी नसून त्याचे विष काढून टाकण्यात आले आहे. इतर काही लोकांनी मुलीच्या या कृतीला धोकादायक म्हटले आहे. तर इतरांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी ही मुलगी व्हिडिओ पोस्ट करणे बंद करेल, तेव्हा तुम्हाला समजेल की तिचे काय झाले असेल. इन्स्टाग्रामवर @lika_pxl नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत 76 लाख व्ह्यूज आणि 9 लाख लाईक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lika Ivanova (@lika_pxl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lika Ivanova (@lika_pxl)