14 वर्षाच्या मुलासोबत तीन अल्पवयीन मित्रांनी केले घृणास्पद कृत्य, आईला पाठवला व्हिडिओ

0
WhatsApp Group

दक्षिण दिल्लीतील हौज खास परिसरामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला त्याच्या तीन मित्रांनी बूट चाटण्यास आणि “अनैसर्गिक लैंगिक कृत्य” करण्यास भाग पाडले होते. आरोपी मुलांनी हे कृत्य त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. रविवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली, कोणीतरी पीडित मुलाच्याआईला तिच्या मुलाचा व्हिडिओ पाठवला. व्हिडिओ पाहिल्यानंतर आईने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी सांगितले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये आरोपींनी प्रथम पीडित मुलाला चाकूचा धाक दाखवत बूट चाटायला लावले आणि नंतर त्याला “अनैसर्गिक लैंगिक कृत्य” करण्यास भाग पाडले. “रविवारी त्या मुलाच्या आईने स्थानकात कॉल केला त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले जेथे कॉल करणाऱ्या महिलेने सांगितले की काही मुलांनी तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले आहे आणि व्हिडिओ तिच्या मोबाइल फोनवर पाठविला गेला आहे.

हेही वाचा – विराट कोहलीवर ‘या’ क्रिकेटपटूने लावले धक्कादायक आरोप! म्हणाला- कोहली माझ्यावर थुंकला…

मुलाने त्याच्या मित्रांच्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितले

मुलाने हौज खासच्या सेंट्रल पार्कमध्ये खेळल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घरी जात असताना त्याच्या 12 ते 14 वर्षांच्या वयोगटातील तीन मित्रांनी त्याला जबरदस्तीने एका ठिकाणी नेले. तीन मुलांपैकी एका आरोपीने पीडितेकडे भाजी कापणारा चाकू दाखवला आणि तिघांनीही त्याला त्याच्यावर ‘अनैसर्गिक लैंगिक कृत्य’ करण्यास भाग पाडले आणि एवढेच नाही तर त्यांनी हे कृत्य त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.

आरोपी मुलांनी धमकी दिली होती

पोलिसांनी सांगितले की, मुलाने या कृत्याबद्दल कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. त्याने सांगितले की, भीतीपोटी मुलाने आपल्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली नाही. मुलाच्या विधानाच्या आधारे, हौज खास पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 377(अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि 506(गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपींना पकडण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी ‘मेटा’ कंपनीला ‘युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर’ (यूआरएल) आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी इतर तपशील देण्यासाठी पत्र लिहिले आहे.