विराट कोहलीवर ‘या’ क्रिकेटपटूने लावले धक्कादायक आरोप! म्हणाला- कोहली माझ्यावर थुंकला…

0
WhatsApp Group

 Virat Kohli: टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी स्टार फलंदाज विराट कोहली संघाचा भाग नाही. त्याने वैयक्तिक कारणांमुळे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विराट कोहलीबाबत एका माजी खेळाडूने मोठा खुलासा केला असून त्याच्यावर धक्कादायक आरोपही केला आहे.

या खेळाडूने विराटवर केले मोठे आरोप 

दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार डीन एल्गरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. 2015 मध्ये कोहलीसोबतच्या पहिल्या भेटीचा संदर्भ देत एल्गर म्हणाला की, त्यावेळी आम्हा दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती. एल्गरने बेटवेने साऊथ आफ्रिकेच्या यूट्यूब चॅनलवर हा खुलासा केला आहे. 2015 मध्ये एल्गरचा पहिला भारत दौरा होता. एल्गारचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हा खुलासा करताना दिसत आहे. माझं विराटसोबत जेव्हा भांडण झालं तेव्हा कोहली माझ्यावर थुंकला, असं एल्गर म्हणाला. त्यावेळी मी देखील विराटला ब‌ॅटने मारण्याची धमकी दिल्याचं, एल्गर याने सांगितलं.

एल्गर म्हणाला, ‘त्या दौऱ्यादरम्यान पिचसंदर्भात विनोद केले जात होते. त्यावेळी मी फलंदाजीसाठी आलो. मला अश्विनविरुद्ध माझी लय कायम ठेवायची होती. त्यावेळी त्याचे नाव जेजा, जेजा, जेजा (रवींद्र जडेजा) आणि कोहली माझ्यावर थुंकले. मग मी पण त्यांना म्हणालो की जर तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला या बॅटने मारेन.

जेव्हा एल्गारला विचारण्यात आले की कोहलीला तुझी स्थानिक भाषा समजली आहे का? यावर एल्गर म्हणाला की कोहलीला समजले होते, कारण एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाकडून खेळतो.

एल्गर आणि कोहली यांच्यात शिवीगाळ

एल्गरने असेही उघड केले की जेव्हा भारतीय संघ 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा कोहलीने ड्रिंक्स दरम्यान केलेल्या वर्तनाबद्दल माफी मागितली होती. भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. कोहली पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smash Sports (@smashsportsinc)

एल्गर हा स्टार खेळाडू आहे, परंतु तो नेहमीच त्याच्या खेळानुसार स्थान मिळवू शकला नाही. याची वेदना एल्गारच्या वक्तव्यातूनही अनेकदा व्यक्त झाली आहे. 2018 मध्ये, डीन एल्गरने आपली वेदना व्यक्त केली आणि सांगितले की त्याने जे काही केले त्याचे त्याला जास्त श्रेय दिले जात नाही.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एल्गर म्हणाला होता की, ‘मी यापूर्वी जे काही केले त्याचे मला फारसे श्रेय दिले गेले नाही. माझ्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांमध्ये फार मोठे नाते आहे असे मला वाटत नाही. बऱ्याच काळापासून, मी जे काही केले ते जमिनीत गाडल्यासारखे वाटले. प्रत्येक संघात माझ्यासारख्या क्रिकेटपटूची गरज आहे हे लोक विसरतात.

एल्गरचा आंतरराष्ट्रीय विक्रम खूपच प्रभावी

36 वर्षीय डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेकडून 86 कसोटी खेळल्या. या कालावधीत त्याने 37.92 च्या सरासरीने 5347 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एल्गरने 14 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत. एल्गरने आठ एकदिवसीय सामनेही खेळले असून त्यात त्याच्या नावावर 104 धावा आहेत. एल्गरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 विकेट्सही घेतल्या आहेत.