
T20 विश्वचषक 2022 चे पात्रता सामने संपले आहेत. आशिया चषक चॅम्पियन श्रीलंका व्यतिरिक्त झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांनी T20 विश्वचषक 2022 सुपर-12 फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. T20 विश्वचषक 2022 सुपर-12 फेरीचा पहिला सामना 22 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. शनिवारी सुपर-12 फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे, मात्र याचदरम्यान भारतीय खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज
भारतीय संघ सध्या मेलबर्नमध्ये सराव करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहली चाहत्यांवर खूप नाराज दिसत आहे. वास्तविक, मेलबर्नमध्ये टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान चाहते खूप आवाज करत होते, यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली नाराज झाला. विराट कोहली चाहत्यांना इतका संतापला की त्याने इशाराही दिला. मात्र, यादरम्यान कोहलीने सरावाच्या वेळी बोलू नका असं त्यांना सांगितले. बाप कामगिरी! टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
During the practice Virat Kohli calmly said something like this to the fans .@imVkohli 👑 pic.twitter.com/3X5LnNTQsV
— Hemant Singh (@Hemant18327) October 20, 2022
विराट कोहलीच्या स्पष्टीकरणानंतर गोंगाट करणाऱ्या चाहत्यांनी होकार दिला. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी सांगितले की, आम्ही तुमच्याशी बोलू, पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल तेव्हा. मात्र, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. T20 World Cup 2022: टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही! विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे धक्कादायक विधान