
भारतीय संघ 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याच्या तयारीत आहे. 23 ऑक्टोबरला संघ पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यावेळी टीम इंडिया काहीतरी खास करून दाखवेल, अशी आशा प्रत्येक भारतीय चाहत्याला आहे. संघाची फलंदाजी मोठ्या लयीत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघ या स्पर्धतील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळेल. जाणून घेऊयात टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांची यादी.
टी-20 विश्वचषकात पाकविरुद्ध सर्वाधिक घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांची यादीत भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण अव्वल स्थानी आहे. त्यानं टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाक विरुद्ध 3 सामने खेळेल आहेत. ज्यात त्याने 6 बळी घेतले आहेत. त्यानंतर या यादीत भारताचा माजी खेळाडू आरपी सिंह दुसऱ्या क्रमाकावर आहे. त्याच्या नावावर 4 बळी आहेत. तर, लक्ष्मीपती बालाजी 3 बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, आर आश्विन चौथ्या, रविंद्र जडेजा पाचव्या, जोगिंदर शर्मा सहाव्या, अमित मिश्रा सातव्या, युवराज सिंह आठव्या, अजित आगरकर नवव्या आणि जसप्रित बूमराह दहाव्या क्रमांकावर आहे.
टी-20 विश्वचषकात पाकविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारे टॉप-10 फलंदाज
क्रमांक | गोलंदाजाचं नाव | सामने | बळी | सर्वोत्तम गोलंदाजी |
1 | इरफान पठाण | 3 | 6 | 3/16 |
2 | आरपी सिंह | 2 | 4 | 3/26 |
3 | लक्ष्मीपती बालाजी | 1 | 3 | 3/22 |
4 | आर आश्विन | 3 | 2 | 2/16 |
5 | रविंद्र जडेजा | 3 | 2 | 1/18 |
6 | जोगिंदर शर्मा | 1 | 2 | 2/20 |
7 | अमित मिश्रा | 1 | 2 | 2/22 |
8 | युवराज सिंह | 5 | 2 | 2/16 |
9 | अजित आगरकर | 1 | 1 | 1/35 |
10 | जसप्रित बूमराह | 2 | 1 | 1/32 |