
T20 World Cup 2022: भारतीय संघ 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याच्या तयारीत आहे. 23 ऑक्टोबरला संघ पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. यावेळी टीम इंडिया काहीतरी खास करून दाखवेल, अशी आशा प्रत्येक भारतीय चाहत्याला आहे. संघाची फलंदाजी मोठ्या लयीत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघ या स्पर्धतील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळेल. टी-20 विश्वचषकात पाकविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
टी-20 विश्वचषकात पाकविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्यानं टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाक विरुद्ध 4 सामने खेळेल आहेत. ज्यात 226.00 च्या सरासरीनं आणि 126.25 च्या स्ट्राईक रेटनं 226 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर दुसऱ्या क्रमाकावर आहे. त्याच्या नावावर 75 धावांची नोंद आहे. तर, रोहित शर्मा 64 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, युवराज सिंह चौथ्या, रॉबिन उथप्पा पाचव्या, एम एस धोनी सहाव्या, ऋषभ पंत सातव्या, शिखर धवन आठव्या, सुरेश रैना नवव्या आणि वीरेंद्र सेहवाग दहाव्या क्रमांकावर आहे.
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 फलंदाज
क्रमांक | फलंदाजांचं नाव | सामने | सामने स्ट्राईक रेट | धावा |
1 | विराट कोहली | 4 | 126.25 | 226 |
2 | गौतम गंभीर | 3 | 127.11 | 75 |
3 | रोहित शर्मा | 5 | 130.61 | 64 |
4 | युवराज सिंह | 5 | 92.18 | 59 |
5 | रॉबिन उथप्पा | 2 | 116.00 | 58 |
6 | एम एस धोनी | 5 | 104.00 | 52 |
7 | ऋषभ पंत | 1 | 130.00 | 39 |
8 | शिखर धवन | 2 | 83.72 | 36 |
9 | सुरेश रैना | 3 | 120.68 | 35 |
10 | वीरेंद्र सेहवाग | 2 | 125.92 | 34 |