KGF स्टार यशच्या वाढदिवसाची तयारी करत असताना मोठा अपघात, तीन तरुणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

Yash Birthday Accident: कन्नड सुपरस्टार यशला आज परिचयाची गरज नाही. या अभिनेत्याने गेल्या काही वर्षांत कन्नड चित्रपटसृष्टीतच नव्हे तर देशभरातील चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. देशभरात त्यांचे फॅन फॉलोअर्सही प्रचंड आहेत. केजीएफ अभिनेता आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि नेहमीप्रमाणे याही वर्षी त्याचे चाहते वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, अभिनेता यशच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे, त्याच्या वाढदिवसाच्या तयारीत असताना अभिनेत्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

सुपरस्टार यशचे चाहते त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी एक दिवस आधीच सुरू करतात. अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या खास निमित्तानं एक दु:खद घटना समोर आली आहे. केजीएफ फेम यशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत असताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कट विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक… मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून अत्याचाराचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

कुठे झाला अपघात?

गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात मध्यरात्री हा अपघात झाला. या घटनेत हणमंता हरिजन (21), मुरली नदविनमणी (20), नवीन गाझी (19) यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लक्ष्मेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यश शेवटचा सुपरहिट चित्रपट केजीएफ 2 मध्ये दिसला होता. चॅप्टर 2 रिलीज झाल्यापासून चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दोन्ही भाग संपूर्ण भारतात ब्लॉकबस्टर ठरले. यानंतर यशने अद्याप त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही, मात्र चित्रपट निर्माते नितीश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये तो रावणाची भूमिका साकारणार असल्याची अफवा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

शाकिब अल हसनने चाहत्याला मारली जोरदार थप्पड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल