शाकिब अल हसनने चाहत्याला मारली जोरदार थप्पड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

0
WhatsApp Group

Shakib Al Hasan Slapped the Fan: शेजारील बांगलादेशात पंतप्रधानपदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेख हसीना सलग पाचव्यांदा पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरल्या आहेत. यावेळी अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब अल हसनही अवामी लीग या पक्षाकडून मैदानात उतरला. येथे त्याला यश मिळाले आहे. मात्र, खासदार होताच बांगलादेशी कर्णधार नव्या वादात सापडल्याचे दिसत आहे.

शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साकिब एका सार्वजनिक कार्यक्रमात त्याच्या एका चाहत्याला थप्पड मारताना दिसत आहे. निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांना भेट देत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती.

T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचे पुनरागमन

Mumbai Police: धक्कादायक… मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून अत्याचाराचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

दरम्यान, एका चाहत्याने मागून त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीने तो नाराज झाला. त्यानंतर शाकिब अल हसनने त्याला जोरदार थप्पड मारली.  शाकिबला राग येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाकडून शाकिब अल हसन यांनी निवडणूक लढवली होती. येथे त्याला पश्चिमेकडील मागुरा शहराचे तिकीट मिळाले. जिथे दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.