Mumbai Police: धक्कादायक… मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून अत्याचाराचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

0
WhatsApp Group

Mumbai Police: मुंबई पोलीस दलातील अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील आठ महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांवर अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्रातून मुंबई पोलीस दलातील एक अत्यंत गंभीर बाब उघडकीस आली आहे. महिला पोलिसांच्या या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल.

मुंबईतील नागपाडा येथील मुंबई पोलीस दलातील बदली विभागातील आठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. महिला पोलिसांनी पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि अन्य एका अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम देतो असे सांगून महिलांचे शोषण केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या महिला पोलिसांना शासकीय पोलीस निवासस्थानी नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचे सांगण्यात येत आहे. आता या आरोपांनंतर पोलीस खातेच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे.