ODI World Cup 2023: फायनलबाबत सौरव गांगुलीने केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला- हा संघ जिंकणार…

0
WhatsApp Group

ODI World Cup 2023: 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मैदान तयार झाले आहे. या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ विजेतेपदावर कब्जा करेल. अंतिम सामन्यापूर्वी देशाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठे वक्तव्य केले आहे. या 51 वर्षीय माजी क्रिकेटपटूने प्रसारमाध्यमांशी खास संवाद साधताना भारतीय संघाच्या विजयाची शक्यता व्यक्त केली. तो म्हणाला, ‘भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा. संघ ज्या पद्धतीने खेळत आला आहे, तसा खेळ केल्यास भारताला रोखणे फार कठीण जाईल. सध्याचा संघ खूप चांगला आहे.

भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी होईल. वास्तविक, ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे ज्याने वर्ल्ड कपमध्ये दोनदा 11-11 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत. जर भारताने अंतिम सामना जिंकला तर सलग 11 सामने जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रम भारत मोडेल.

‘Talented Young Batsman’, शाळेच्या अभ्यासक्रमात हिटमॅन रोहित शर्माचा धडा

भारतीय संघ जबरदस्त फॉर्मामध्ये : टीम इंडियाचे खेळाडू यंदा चमकदार कामगिरी करत आहेत. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर ते बॉलिंगपर्यंत सर्व 11 खेळाडू फॉर्मात आहेत. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजीत सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज हे चांगल्या फॉर्मात आहेत.

IND vs AUS: फायनल सामन्यात पाऊस पडला तर… कोण ठरणार विजेता? काय सांगतो ICC चा नियम

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, कांगारू संघाचा वरचष्मा राहिला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आठ सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने पाच सामने जिंकले आहेत.