विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना या शानदार सामन्यासाठी उत्सुकता आहे, कारण दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि हाय व्होल्टेज सामना असेल याची खात्री आहे. पण, आता प्रश्न पडतो की पावसामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर कोणता संघ ट्रॉफी उचलणार? चला तर मग तुम्हाला सांगणार आहोत संपूर्ण माहिती…
पाऊस पडला तर चॅम्पियन कोण होणार?: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक 2023च्या सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये याची गरज नव्हती. आता अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी 20 नोव्हेंबर हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी पाऊस पडला, तर सामना जिथे थांबला होता, त्याच ठिकाणापासून राखीव दिवशी सुरू होईल.
20 years later, they meet again in the Men’s CWC Final 🏆
All about the #CWC23 Final ➡️ https://t.co/DYhuEFNkZx pic.twitter.com/wZbjKvkhfz
— ICC (@ICC) November 18, 2023
‘Talented Young Batsman’, शाळेच्या अभ्यासक्रमात हिटमॅन रोहित शर्माचा धडा
परंतु, दोन्ही दिवशी पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर साखळी टप्प्यानुसार गुणतालिकेत चांगली स्थिती असलेला संघ विजेता घोषित केला जाईल. याचा अर्थ असा की, जर पाऊस पडला तर भारत 2023 च्या विश्वचषकाचा चॅम्पियन होईल. होय, टीम इंडिया या स्पर्धेत विजयरथावर स्वार आहे आणि लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकले आहेत आणि 18 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर, कांगारू संघ 7 सामने जिंकून 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
अहमदाबादमधील हवामान कसे असेल?: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नगण्य आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, पावसाची फक्त 1% शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 50-50 षटकांचा पूर्ण जल्लोषात खेळवला जाईल, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
रेसलर द ग्रेट खली दुसऱ्यांदा बनला बाबा, पत्नी हरमिंदर कौरने मुलाला दिला जन्म