IND Vs AFG: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचे पुनरागमन

0
WhatsApp Group

India vs Afghanistan Team India Squad: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या टी-20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं पुनरागमन झालं आहे. रोहित आणि विराट एका वर्षाहून अधिक काळानंतर टी-20 संघात परतले आहेत. रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाची कमान सोपवण्यात आली आहे. शेवटच्या वेळी हे दोन खेळाडू 2022 च्या टी-20 विश्वचषकात खेळताना दिसले होते. पुन्हा एकदा रोहित शर्मा भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

टी-20 विश्वचषक 2024 जूनमध्ये सुरू होईल. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानसोबतची ही मालिका टीम इंडियासाठी खूप खास आहे. या मालिकेत टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेनंतर 2024 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात कोणत्या खेळाडूला स्थान मिळेल हे जवळपास निश्चित होणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठीही ही टी-20 मालिका खूप महत्त्वाची असेल, कारण या दोन्ही खेळाडूंनी वर्षभरात एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आगामी टी-20 विश्वचषक 2024 च्या तयारीची चाचपणी करण्याची अफगाणिस्तानविरुद्धची सुवर्णसंधी रोहित-विराटलाही आहे.

महेंद्रसिंह धोनीचा हुक्का ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या एक वर्षापासून चाहते टी-20 क्रिकेटमधील या दोन खेळाडूंची वाट पाहत आहेत. मात्र, रोहित-विराट आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसले होते.

टीम इंडियाचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग .