अर्ध्यावरती डाव मोडला…बॉलिवुडच्या आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट

0
WhatsApp Group

Isha Koppikar- Timmy Narang Divorce: लग्नाच्या 14 वर्षांनंतर अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि तिचा पती टिमी नारंग विभक्त झाल्याच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या जोडप्याने आता अधिकृतपणे एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे. अभिनेत्री तिची 9 वर्षांची मुलगी रियानासोबत शिफ्ट झाली आहे. टिमी नारंगने अलीकडेच एका न्यूज पोर्टलला त्याच्या घटस्फोटाची पुष्टी केली आणि अनेक धक्कादायक गोष्टीही सांगितल्या.

ETimes शी बोलताना, ईशा कोप्पीकरचा माजी पती टिमीने त्यांच्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला. तो म्हणाला घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते दीड वर्षांपासून घटस्फोटाचा विचार करत होते. टिमीने खुलासा केला की, “गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घटस्फोट मंजूर झाला होता. आम्ही  दोघेही आता आपल्या आयुष्यात पुढे जाण्यास मोकळे आहोत.

KGF स्टार यशच्या वाढदिवसाची तयारी करत असताना मोठा अपघात, तीन तरुणांचा मृत्यू

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Koppikar Narang (@isha_konnects)

ईशाने 2009 मध्ये बिझनेसमन टिमी नारंगसोबत लग्न केले

बिझनेसमन टिमीने असेही शेअर केले की अभिनेत्रीने आपल्या मुलीसह आपले घर सोडले आहे. ईशा कोप्पीकर आणि टिमी नारंग यांची प्रेमकहाणी तेव्हापासून सुरू झाली जेव्हा ते कॉमन फ्रेंड्सद्वारे एकमेकांना भेटले. हळूहळू त्यांचे प्रेम वाढत गेले आणि 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. या जोडप्याला 9 वर्षांची मुलगीही आहे. मात्र, आता 14 वर्षांनंतर दोघेही वेगळे झाले आहेत.

बिलकिस बानो प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का, गुजरात सरकारलाही फटकारले

ईशाने हिंदी चित्रपटांसोबतच साऊथ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. डॉन, 36 चायना टाउन आणि कृष्णा कॉटेज सारख्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये ती दिसली. ईशाचा शेवटचा रिलीज झालेला तामिळ चित्रपट आयलन होता. 2019 मध्ये ईशानेही राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. ती भाजपमध्ये (भारतीय जनता पक्ष) सामील झाल्या आणि सध्या महिला वाहतूक शाखेत भाजप अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.