मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावले? मोठा खुलासा आला समोर

आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी फ्रेंचायझीच्या या निर्णयावर मोठे वक्तव्य केले आहे.

0
WhatsApp Group

Rohit Sharma: आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आणि फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले होते. अशा परिस्थितीत संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय का घेतला यावर मोठे विधान केले आहे.

रोहित शर्माकडून कर्णधारपद का हिसकावले?

मुंबईचे प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाले की, ”रोहित शर्माने कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. त्याने मुंबईला 5-5 ट्रॉफी दिल्या, ही मोठी गोष्ट आहे. पण रोहितवर कर्णधारपदाच्या ओझ्यामुळे तो एक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करू शकला नाही हे आपण बघू शकतो. रोहितला फलंदाज म्हणून संघासाठी आणखी चांगली कामगिरी करता आली असती, पण कर्णधारपदाच्या ओझ्यामुळे तो फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही. या कारणास्तव, आम्ही त्याला कर्णधारपदावरून दूर केले आहे, जेणेकरून तो फलंदाज म्हणून संघासाठी चांगली कामगिरी करू शकेल.

हेही वाचा – IND vs ENG: विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळणार का? राहुल द्रविडने दिली मोठी अपडेट

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाले की, “हार्दिक पांड्याला संघात घेणं हा क्रिकेटमधील अंतर्गत विषय आहे. हा एक ट्रांजिशन फेज आहे. याबाबत भारतीयांना माहिती नाही. लोकं खूपच भावनिक होतात पण भावना दूर ठेवल्या पाहिजेत. रोहित शर्मा खेळाडू म्हणून ग्रेट आहेच आणि त्याला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊद्या. चांगल्या धावा करू द्या”, असं मार्क बाउचर म्हणाले आहेत.”

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार

हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून डावलण्यात आलं आहे. हा संघमालकांचा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून रोहित शर्माच्या अनेक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम हँडलला अनफॉलो केलं होतं. त्याच इंस्टाग्राम हँडलचं अनेक फेक फॉलोवर्स वाढवण्याबाबत बातम्या येत होत्या.

हेही वाचा – U19 WC 2024: सेमीफायनलमध्ये टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, येथे विनामूल्य सामना पहा