IPL 2024 Live Streaming: आयपीएलचे सामने मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

0
WhatsApp Group

IPL 2024 Free Live Streaming: आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चेन्नईत आमनेसामने येणार आहेत. चेन्नई गेल्या मोसमाचा विजेता आहे. त्याने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला. मात्र यावेळी गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये पहिला सामना होत नाही. चाहत्यांना स्पर्धेतील प्रत्येक सामना विनामूल्य पाहता येणार आहे. यासाठी फक्त इंटरनेट आणि स्मार्टफोनची आवश्यकता असेल.

यावेळीही IPL सामना Jio सिनेमावर दाखवला जाणार आहे. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही. चाहत्यांना सर्व सामने विनामूल्य ऑनलाइन पाहता येणार आहेत. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या मोसमातील पहिला सामना धोनी आणि कोहली यांच्यात होणार आहे.

हेही वाचा – IPL 2024 पूर्वी आरसीबीचा मोठा निर्णय! बदललं संघाचं नाव

तुम्हाला आयपीएल टीव्हीवर बघायचे असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. आयपीएल समालोचन हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असेल. गेल्या वेळी जिओ सिनेमाने चाहत्यांना भोजपुरी, तामिळ आणि तेलगू भाषेतही कॉमेंट्रीचा पर्याय दिला होता. या मोसमातही हेच सुरू राहणार आहे. चाहत्यांना एचडीमध्येही आयपीएलचा आनंद घेता येणार आहे.

देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 22 मार्च रोजी सीएसके आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना होणार आहे. यानंतर दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना 23 मार्च रोजी चंदीगड येथे होणार आहे. मोसमातील तिसरा सामना KKR आणि SRH यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होणार आहे.

हेही वाचा – पुणे हादरलं! कॉलेज विद्यार्थिनीने वसतिगृहात स्वतःला पेटवून घेतले