IPL 2024 पूर्वी आरसीबीचा मोठा निर्णय! बदललं संघाचं नाव

0
WhatsApp Group

IPL 2024 पूर्वी विराट कोहलीची टीम RCB ने मोठा निर्णय घेतला आहे. आरसीबीने आपल्या संघाचे नाव बदलले आहे. अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, आता आरसीबीने नाव बदलले आहे. वुमन्स प्रीमियल लीगमधील आरसीबीने संघाने विजेतेपद जिंकल्यावर फ्रँचायसीने हा निर्णय घेतला आहे. आरसीबी संघाचं नवीन नाव काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. नावात काय बदल केला गेला आहे? तो बदल काय आहे जाणून घ्या.

आरसीबी संघांच नवीन नाव हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं करण्यात आलं आहे. सुरूवातीला नेमका काय बदल केला हो कोणाच्या लक्षात नाही आलं. आरसीबी संघाच्या नावातील बंगलोरच्या ऐवजी आता बंगळुरू केलं आहे. 2014 मध्ये बंगलोर शहराच नाव बदलून बंगळुरू असं करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा आरसीबीने आपल्या नावात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आता दहा वर्षांनी आरसीबीनेही नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

19 मार्च रोजी RCB ने बेंगळुरूमध्ये अनबॉक्सिंग इव्हेंट आयोजित केला होता. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली ते कर्णधार फाफ डू प्लेसिसपर्यंत या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात आरसीबीची नवी जर्सीही समोर आली आहे. यावेळची जर्सीही पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आहे. आरसीबीचा लोगो बदलला आहे. पूर्वी जर्सीचा वरचा भाग लाल होता, मात्र आता तो निळा करण्यात आला आहे.

IPL 2024 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. RCB महिला संघाने WPL 2024 मध्ये ट्रॉफी जिंकून RCB चाहत्यांना ट्रॉफीची चव चाखली आहे. पण चाहते अजूनही पूर्णपणे खूश नाहीत. चाहत्यांना आता विराट कोहलीनेही ट्रॉफी जिंकावी असं वाटतं आहे.

RCB संघ 2008 पासून आयपीएल खेळत आहे. विराट कोहली देखील 2008 पासून संघाचा भाग आहे, परंतु अद्याप कोहलीच्या नावावर एकही ट्रॉफी नाही. अशा परिस्थितीत चाहते कोहलीला पहिल्या ट्रॉफीची मागणी करत आहेत. अशा स्थितीत आरसीबीचा पुरुष संघही प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होतो का, हे पाहावे लागेल.