विराट कोहलीने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

WhatsApp Group

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 131 धावांवर गुंडाळला, ज्यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून 76 धावा आल्या, याशिवाय इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू शकला नाही. त्याचबरोबर आपल्या खेळीच्या जोरावर कोहलीने जागतिक क्रिकेटमध्येही मोठे स्थान मिळवले आहे. आता कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 7 वेळा 2000 हून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

कोहलीने कुमार संगकाराला मागे टाकले

भारताच्या दुसर्‍या डावात विराट कोहलीने 28 वी धाव केली तेव्हा त्याने या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये 2000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठण्यासाठी कोहलीला केवळ 35 डाव लागले. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणाऱ्या फलंदाजांवर नजर टाकली तर कोहलीशिवाय त्यात दुसरे नाव शुबमन गिलचे आहे. कोहलीने यावर्षी वनडे फॉरमॅटमध्ये 27 सामन्यात 72.47 च्या सरासरीने 1377 धावा केल्या आहेत. 2000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करून कोहलीने कुमार संगकाराला मागे सोडले ज्याने जागतिक क्रिकेटमध्ये 6 वेळा ही कामगिरी केली होती.

ऋषभ पंतला 1.6 कोटींचा चुना लागला; माजी क्रिकेटपटूने केली फसवणूक

या भारतीय खेळाडूंचाही या यादीत समावेश 

एका वर्षात 2000 हून अधिक धावा (7 वेळा ) करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीतील इतर भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर 5 वेळा, सौरव गांगुली 4 वेळा आणि राहुल द्रविडचा 3 वेळा समावेश आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो आता सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिनने आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत एकूण 1741 धावा केल्या आहेत. तर कोहलीने आता 1350 धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडला मागे टाकण्याचे काम केले आहे.