ऋषभ पंतला 1.6 कोटींचा चुना लागला; माजी क्रिकेटपटूने केली फसवणूक

0
WhatsApp Group

राजधानी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलिसांनी मृणाक सिंग नावाच्या एका ठगाला अटक केली आहे. आपण IPL च्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे, कर्नाटक राज्याचा वरिष्ठ IPS अधिकारी आहे असे इतर अनेक दावे करून त्याने देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालक/व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचीही फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाक सिंग हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळला आहे. जुलै 2022 मध्ये ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर असल्याचे भासवणारा आरोपी हॉटेलमध्ये राहत होता आणि भाडे विचारले असता त्याने आपली कंपनी आदिदास ही रक्कम देणार असल्याचे सांगितले. त्याने नंतर सांगितले की आपण पैसे भरण्यासाठी माझ्या ड्रायव्हरला रोख रकमेसह पाठवेन, परंतु त्याने कोणालाही हॉटेलमध्ये पाठवले नाही.

‘काही दिवसांपूर्वी हेच लोक शिव्या देत होते’, शतक झळकावल्यानंतर केएल राहुलचे मोठे वक्तव्य

स्थानिक न्यायालयाने आरोपीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सोमवारी त्याला आयजीआय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तो हाँगकाँगला जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी केली असता आरोपीने वारंवार पोलिसांची दिशाभूल केली. त्याने असाही दावा केला की आपले वडील 1980 ते 1990 च्या दशकात भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होते आणि सध्या ते IGI विमानतळावर एअर इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत.

ऋषभ पंतचीही फसवणूक केली 

आरोपी मृणांक सिंगला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याने स्वतःची ओळख कर्नाटकचे एडीजीपी आलोक कुमार अशी दिली. 2020-21 मध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंतचीही 1.63 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. यामध्ये मृणांक सिंगचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. आरोपीच्या मोबाईल फोनवरून त्याची तरुण मॉडेल/मुलींशी असलेली मैत्री उघड झाली असून त्यात अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे आहेत, त्यातील काही फोयो व्हिडिओ आक्षेपार्ह आहेत.