भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना चेन्नईत खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही 2-1अशा फरकाने जिंकली. भारतीय संघाचा या वर्षातील हा पहिला एकदिवसीय मालिका पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 269 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात 270 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 248 धावांवर ऑलआऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाला ही मालिका गमवावी लागली. याआधी टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 25 मालिका जिंकल्या होत्या. सलग 25 मालिका विजयानंतर टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. 2019 मध्येही भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाला सलग 7 वनडे मालिका जिंकल्यानंतर पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. कोहली त्याच्या खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसशीही सामना केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात 21व्या षटकात भारतीय संघाची धावसंख्या 2 बाद 111 अशी होती आणि त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असलेला विराट स्टॉइनिसला परतताना समोर आला. गोलंदाजी यादरम्यान दोघेही एकमेकांना भिडले. दोन्ही खेळाडू तोंडातून काहीही बोलले नसले तरी दोघांच्या देहबोलीने संपूर्ण गोष्ट सांगितली. तरीही दोन्ही खेळाडू पुन्हा हसताना दिसले.
या सामन्यात विराटने 72 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार लगावत 54 धावा केल्या. त्याचवेळी स्टॉइनिसने 9.1 षटकात 43 धावा देत एक विकेट घेतली.चार वर्षांनंतर मायदेशात वनडेत भारताचा हा पहिलाच मालिका पराभव आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा वनडे क्रमवारीत नंबर 1 बनला आहे.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी पुन्हा एकदा निराशा केली. या खेळाडूंमध्ये पहिले नाव आहे ते सूर्यकुमार यादवचे. या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये तो गोल्डन डकवर आऊट झाला. या सामन्यात सूर्याशिवाय केएल राहुलनेही निराशा केली. या सामन्यात त्याने 32 धावा केल्या. पण टीम इंडियासाठी मोठी इनिंग खेळण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
पहा व्हिडिओ
Marcus Stoinis and Virat Kohli 😹👌🤙 !! #ViratKohli𓃵 #stoinis#INDvsAUS #CricketTwitter pic.twitter.com/tqUFT9exNl
— Diptiman Yadav (@Diptiman_yadav9) March 22, 2023
ODI World Cup 2023: या तारखेपासून रंगणार एकदिवसीय विश्वचषकाचा थरार