आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. देशातील सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातही सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून वेगवेगळ्या पक्षातील नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट हेदेखील एकमेकांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हल्ला करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदारांनी 50 खोके घेऊन शिंदेंची साथ दिली, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. ठाकरे गटाच्या या आरोपामुळे ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणादेखील चांगलीच प्रसिद्ध झाली. दरम्यान, याच आरोपांवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले काय म्हणाले? – आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आहेत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का पन्नास खोके 50 खोके सर्व नेते मंडळी समोर आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत. आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यांना धडकी भरली. मी म्हटले तुमची आम्हाला संपत्ती नको. बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे.
Suhani Bhatnagar Passes Away: धक्कादायक! ‘दंगल’ फेम अभिनेत्रीचा 19 व्या वर्षी निधन
शिवसेनेचे महाअधिवेशन
🗓️ 17-02-2024📍कोल्हापूर https://t.co/rWuBQLei6m
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 17, 2024
आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हालाच मिळाला पाहिजे असे पत्र तुम्ही आम्हाला पाठवले. आमच्या लक्षात आले की तुम्हाला बाळासाहेबांची विचार नकोत. म्हणून मी उद्धव ठाकरे यांना 50 कोटी देऊन टाकले. 50 कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तरी मनाची पाहिजे होती. पण तुम्हाला तसे काही न वाटता रोज तुम्ही आमच्यावरच आरोप करत सुटलाय!!
उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी बोलेन. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते, तेथे आता रडण्याचा आवाज येतो. असं एकनाथ शिंदे म्हणाले.