Suhani Bhatnagar Passes Away: धक्कादायक! ‘दंगल’ फेम अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी निधन

WhatsApp Group

Suhani Bhatnagar Passes Away: मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘दंगल’मध्ये छोट्या बबिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या अशा निधनाने तिच्या आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोक सुहानीला दंगल गर्ल म्हणूनही ओळखत होते. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या निधनाने चाहते हैराण झाले आहेत. फरिदाबादमध्ये राहणाऱ्या सुहानीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर येत आहे. तिच्या शरीरात पाणी भरल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. तिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhani Bhatnagar (@bhatnagarsuhani)

सुहानी भटनागरने 2016 मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती. त्याच्या आईचे नाव पूजा भटनागर आहे. पदार्पणापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. आता तरूण वयातच तिने या जगाचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा – Video: मोठी दुर्घटना! जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळला, 8 जण जखमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhani Bhatnagar (@bhatnagarsuhani)

समोर आलेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचले. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या औषधोपचारांचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने या जगाचा निरोप घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhani Bhatnagar (@bhatnagarsuhani)

सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’ (2016) मधून तिला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात तिने ज्युनियर बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले होते. दंगलनंतर तिने अभ्यासासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा अभिनयाकडे परतणार होती. पण आता तिचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे.

हेही वाचा – HBD Ab de Villiers: एबी डिव्हिलियर्सचे 5 विक्रम जे मोडणे अशक्य