दुःखद, या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन

0
WhatsApp Group

‘अनुपमा’मध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे यांचे निधन झाले आहे. काल 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते 51 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. यापूर्वी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती आणि आता नितीश पांडे यांच्या जाण्याने लोकांनाही धक्का बसला आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. याबाबत त्यांनी सर्वप्रथम फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली. ते एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी मिळाली. त्यांनी सांगितले की, नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मृतदेह केव्हा आणण्यात आला आणि अंत्यसंस्कार केव्हा होणार याबाबत त्यांना फारशी माहिती नाही.

नितीश पांडे यांनी 1990 मध्‍ये थिएटरमधून करिअरला सुरुवात केली. त्याला पहिला ब्रेक 1995 मध्ये ‘तेजस’ शोमध्ये मिळाला, ज्यामध्ये त्याने गुप्तहेराची भूमिका केली होती. यानंतर त्याने ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘अस्तित्व… एक प्रेम कहानी’, ‘साया’, ‘जस्टजू’, ‘दुर्गेश नंदिनी’ आणि ‘अनुपमा’ सारख्या शोमध्ये काम केले. नितीश पांडे यांनी ‘ओम शांती ओम’ आणि ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘ड्रीम कॅसल प्रॉडक्शन’ नावाचे त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे रेडिओ शो तयार करते.

मनोरंजन इंडस्ट्री हादरली! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू