T-20 World Cup 2024: T-20 विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी! ‘या’ दिवशी पाकिस्तानसोबत भिडणार

WhatsApp Group

T-20 World Cup 2024: 2024 हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचे असणार आहे. सध्या टी-20 हा सर्वात लोकप्रिय फॉरमॅट आहे आणि त्यामुळे टी-20 विश्वचषकावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय चाहत्यांना या विश्वचषकाकडून विशेष अपेक्षा आहेत कारण टीम इंडियाने दीर्घकाळ एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. याशिवाय या विश्वचषकातील एका सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या सामन्यांमध्ये गणला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना आहे. हा सामना कधी होणार याची तारीख आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने येतात. त्यामुळे हा सामना अधिक खास बनला आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

Gautami Patilच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी…मंत्री अब्दुल सत्तारांकडून प्रेक्षकांना थेट शिवीगाळ, VIDEO व्हायरल

भारत-पाकिस्तान सामना कधी होईल?

यंदाच्या टी-20 विश्वचषकाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नसले तरी क्रीडा क्षेत्रातील वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. या विश्वचषकात भारताचा हा दुसरा सामना असेल. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. 12 जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया 15 जूनला कॅनडाशी भिडणार आहे. म्हणजेच या गटात भारतासमोर खरे आव्हान पाकिस्तानचेच असेल. 2007 पासून टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला फक्त एकदाच पराभूत केले आहे.

यंदा होणारा टी-20 विश्वचषक खूपच वेगळा असेल. यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यापैकी 12 संघ मुख्य फेरीत प्रवेश करतील. यानंतर सुपर-8 फेरी होईल. त्यानंतर उपांत्य फेरी आणि नंतर अंतिम फेरी. 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने मजल मारली होती, पण इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला आणि विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला.

नेहा पेंडसेच्या वांद्रे येथील घरातून 6 लाखांचे दागिने चोरीला

टीम इंडियाचे वेळापत्रक 

5 जून: भारत विरुद्ध आयर्लंड (न्यूयॉर्क)
9 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान (न्यूयॉर्क)
12 जून: भारत विरुद्ध यूएसए (न्यूयॉर्क)
15 जून: भारत विरुद्ध कॅनडा (फ्लोरिडा)