Gautami Patilच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी…मंत्री अब्दुल सत्तारांकडून प्रेक्षकांना थेट शिवीगाळ, VIDEO व्हायरल

WhatsApp Group

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते.

गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांची चांगलीच कसरत होते. त्यातच मंत्र्याचा वाढदिवस आणि गौतमी पाटील हे समीकरण छत्रपती संभाजीनगरात जुळून आले. येथे कार्यक्रमात काही तरुणांनी प्रचंड हुल्लडबाजी केली. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावेळी राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे नाराज झाले. गोंधळ सुरु राहिल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

मंत्री अब्दुल सत्तार याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठा राडा झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावेळी अब्दुल सत्तार सुद्धा संतापले. सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेतला. हुल्लडबाज तरुणांवर लाठीमार करा, असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. इतकचं नाही, तर अब्दुल सत्तार यांनी भर स्टेजवरून तरुणांना शिवीगाळ देखील केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेहा पेंडसेच्या वांद्रे येथील घरातून 6 लाखांचे दागिने चोरीला

विजय वडेट्टीवार यांची टीका

यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्वीट करत निशाणा साधला आहे. ”मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात.” असं त्यांनी एक ट्वीट केलं आहे.