Amravati Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडलं

WhatsApp Group

जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीने अंगणात बसलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात ही घटना घडली. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाचोना गावात ही घटना घडली. Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण, 8 रुग्ण एकट्या मुंबईत

या घटनेतील आरोपीचा गावात दारूचा धंदा अवैधरित्या सुरू असल्याचे बोलले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, नाचोना गावातील अंभोरे कुटुंब त्यांच्या घरातील अंगणात बसले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी बोलत असलेल्या अंभोरे कुटुंबीयांना चिरडले. पूर्वीच्या वैमनस्यातून त्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. Kangana Ranaut: बॉलीवूड क्वीन कंगना रणौत 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार

मृतांची नावे 

  • अनुसया शामराव अंभोरे
  • शामराव लालूजी अंभोरे
  • अनारकली मोहन गुजर