सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

WhatsApp Group

Singer Anup Ghosal passes away: चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा दु:खद बातमी येत आहे. प्रसिद्ध बंगाली गायक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अनुप घोषाल यांचे आज (शुक्रवारी) निधन झाले. अनूप घोषाल यांनी वयाच्या 78व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अनुप घोषाल यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. अनुप घोषाल यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. अनुप घोषाल यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे.

रोहित शर्माकडून गेलं मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद! हार्दिक पांड्या आता MI चा नवा कर्णधार

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनुप घोषाल हे गेल्या अनेक दिवसांपासून वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते, त्यामुळे त्यांना दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्याने आज दुपारी 1.40 वाजता त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध गायक अनूप घोषाल यांनी सत्यजित रे यांच्या ‘गुपी गायन, बाघा बायन’ (1969) आणि ‘हिरक राजार देशे’ (1980) मध्ये आपला आवाज दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी अनूप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

अनुप घोषाल यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणारे अनुप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त करते. उस्ताद घोषाल यांची कारकीर्द वयाच्या अवघ्या चार वर्षापासून सुरू झाली.

आनंदाची बातमी…अभिनेत्री सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, फोटो केला शेअर

संगीतातील कामगिरीसोबतच अनुप यांनी राजकारणातही प्रवेश केला. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत ते उत्तरपारा मतदारसंघातून विजयी झाले. तथापि, त्यांचा राजकीय कार्यकाळ अल्पकाळ टिकला, कारण तृणमूल काँग्रेसने त्यांना नंतरच्या निवडणुकांसाठी उमेदवारी दिली नाही. मात्र, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन पश्चिम बंगाल सरकारने त्यांना 2011 मध्ये ‘नझरूल स्मृती पुरस्कार’ आणि २०१३ मध्ये ‘संगीत महासन्मान’ देऊन गौरविले.