अभिनेत्री सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, फोटो केला शेअर

द कपिल शर्मा शोमध्ये दिसलेली कॉमेडियन सुगंधा मिश्रा आई झाली आहे. या अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. ही खुशखबर स्वतः अभिनेत्री आणि तिचे पती डॉ. संकेत भोसले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे.

WhatsApp Group

Actress Sugandha Mishra: प्रसिद्ध विनोदी कलाकार सुगंधा मिश्रा आणि डॉ.संकेत भोसले यांच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 35 वर्षीय सुगंधाने मुलीला जन्म दिला आहे. खुद्द सुगंधा आणि तिच्या पतीने ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. दोघांनी इन्स्टा वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांना त्यांच्या छोट्या मुलीची झलक दाखवली आहे.

सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांनी हॉस्पिटलचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली की त्यांच्या घरी एक छोटी परी आली आहे. व्हिडिओमध्ये संकेत खूप आनंदी दिसत असून तो म्हणतो की मी बाप झालो आहे. यानंतर, तो हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेल्या पत्नी सुगंधा यांच्याकडे कॅमेरा दाखवतो आणि म्हणतो की ती आई झाली आहे. यानंतर सुगंधा आणि संकेत यांनी त्यांच्या मुलीची झलकही दाखवली आहे. आता चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या जोडप्याच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि पालक बनल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत.

पाहा उर्फीची अजब फॅशन! अतरंगी लुक होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ

लग्नाच्या अडीच वर्षानंतर सुगंधा मिश्रा बनली आई 

सुगंधा मिश्राला कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मधून लोकप्रियता मिळाली. कॉमेडी व्यतिरिक्त सुगंधा ही एक उत्तम गायिका देखील आहे, जिने सा रे ग म प च्या मंचावरही तिच्या आवाजाची जादू निर्माण केली आहे. 2021 मध्ये सुगंधा मिश्राने कॉमेडियन संकेत भोसलेसोबत लग्न केले. लग्नाच्या अडीच वर्षानंतर दोघांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे, त्यामुळे दोघेही खूप आनंदी आहेत.

बॉबी देओलने विमानतळावर चाहत्यासोबत केले हे कृत्य, व्हायरल व्हिडिओवर लोक संतापले