Video: मोठी दुर्घटना! जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळला, 8 जण जखमी

WhatsApp Group

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट क्रमांक 2 जवळील मंडप कोसळlला आहे. मंडप कोसळल्याने अनेक लोक गाडल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ताज्या माहितीनुसार, या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने गेट क्रमांक दोनवर मोठा पंडाल लावण्यात आला होता. 11 वाजण्याच्या सुमारास अचानक संपूर्ण मंडप खाली आला आणिमंडपाखाली असलेले लोक गाडले गेले. याची माहिती तत्काळ पोलीस व अग्निशमन विभागाला देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सुमारे 8 जण जखमी झाले असून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. जखमींना पंडालमधून बाहेर काढण्यात येत आहे. ताज्या माहितीनुसार 20 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी हजर आहेत.