ठाकरे गटाला धक्का; अब्रूनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास, 25 हजारांचा दंडही ठोठावला
Sanjay Raut : मेघा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Related Posts
महाराष्ट्र, महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलंय.
संजय राऊत यांना न्यायालयानं 15 दिवसांच्या कारावासाची आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती, मेधा किरीट सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दिली.