शिवाजी पार्क आंदोलनातील मॉडेल रिया यादव अहिरला ऑनलाइन ट्रोलिंगचा फटका; सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

WhatsApp Group

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर ठामपणे उभी राहणारी मॉडेल रिया यादव अहिरची जोरदार चर्चा झाली.

.तिचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. यानंतर आता पुन्हा रिया यादव अहिर ऑनलाइन ट्रोलिंग आणि छळामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सातत्याने होणारा छळ, बदनामी, अश्लील कमेंट्स (Slut-Shaming) आणि मानहानिकारक पोस्ट्सविरोधात रियाने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

२२ जुलै रोजी शिवाजी पार्क येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी रिया यादव अहिर पोलिसांच्या वाहनासमोर एकटी उभी राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. तर काही सोशल मीडिया युजर्सने तिच्यावर आक्षेपार्ह आणि मानहानीकारक पोस्ट्स केल्याचा आरोप आहे.