
Republic Day 2025: भारतात दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो 26th January history. 2025 मध्ये म्हणजेच या वर्षी देश आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे Republic Day 2023. 1947 साली देशाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, पण स्वतःची राज्यघटना नव्हती. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान मिळाले. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि त्यासोबत भारत एक सार्वभौम राज्य बनला, ज्याला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. भारताचा स्वातंत्र्यदिन ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव म्हणून तर प्रजासत्ताक दिन संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे परेड जी राजपथ, दिल्ली येथून सुरू होते आणि इंडिया गेट येथे संपते. या दिवशी देशाचे राष्ट्रपती राजपथ, नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करतात. या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल देखील परेड आणि एअर शोद्वारे भारताचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा प्रदर्शित करतात.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास 26th January history
प्रजासत्ताक दिन हा दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणले गेले. 26 जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली. कारण याच दिवशी 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व significance of 26th January
प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहे. याच दिवशी 1950 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज घोषित केले, ही भारताच्या वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्याची घोषणा होती. हा दिवस भारतीय नागरिकांना लोकशाही पद्धतीने त्यांचे सरकार निवडण्याच्या शक्तीची आठवण करून देतो. भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेसाठी देश हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करतो.