Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जाणून घेऊयात असे 5 बॉलिवूड चित्रपट जे देशभक्तीने भरलेले आहेत…
‘स्वदेस’ (2004)
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित, शाहरुख खानने ‘स्वदेस’मध्ये उत्तम काम केले होते. चित्रपटाची कथा नासाच्या एका शास्त्रज्ञाभोवती फिरते. शाहरुखने या चित्रपटात एका शास्त्रज्ञाची भूमिका केली आहे जो नंतर आपल्या मातृभूमीच्या प्रेमात पडतो आणि भारतात परततो आणि आपले मूळ गाव विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो.
रंग दे बसंती (2006)
आमिर खान स्टारर ‘रंग दे बसंती’ जवळपास 16 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या मित्रांच्या गटाची कथा आहे. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला.
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या…
‘राझी’ (2018)
हरिंदर सिंग सिक्का यांच्या कॉलिंग सेहमत या कादंबरीवरून प्रेरित असलेल्या या चित्रपटात सेहमत खान या तरुण काश्मिरी मुलीची प्रेरणादायी कथा आहे, जी इक्बाल सय्यद या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करते आणि पाकिस्तानमध्ये भारतीय गुप्तहेराची भूमिका पार पाडते.
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (2019)
विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी बघता येणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.
Republic Day 2024: 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या काही खास गोष्टी
बॉर्डर (1997)
बॉर्डर हा चित्रपट 1997ला प्रदर्शित झाला होता मात्र या चित्रपटाचे गारुड आजही तरुणाईच्या मनावर कायम आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात 1971 मध्ये झालेल्या लढाईवर हा चित्रपट आधारित आहे.