Republic Day 2024: 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या काही खास गोष्टी

0
WhatsApp Group

Republic Day 2024: देशात दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. संपूर्ण देश या दिवसाची वाट पाहत असतो. या दिवशी सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये तिरंगा अभिमानाने फडकवला जातो. कदाचित हा प्रश्न तुमच्या मनात येईल की आपण 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनाशी संबंधित काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत why is republic day celebrated on 26 january .

1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वतंत्र प्रजासत्ताक बनण्यासाठी आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटना स्वीकारली. लोकशाही शासन प्रणालीसह 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू करण्यात आले, तसेच या दिवशीच भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले होते.

हेही वाचा – Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या…

प्रजासत्ताक दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?

26 जानेवारी 1950 रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी देऊन ध्वजारोहण करून भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले होते. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जात आहे.