उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नारायण राणेंना मोठा धक्का दिलाय. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजन तेली यांनी मातोश्रीवर हा पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजन तेली यांच्याप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षप्रवेश करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आज एकूण 5 पक्षप्रवेश झाले आहेत. रोज कोणी ना कोणीतरी चांगले कार्यकर्ते, माणसं आमच्या पक्षात येत आहेत. राजन तेली मूळचे आमचेच आहेत. मधल्या काळात त्यांची दिशाभूल झाली. आता ते पून्हा आपल्या घरी परतले.”
राजन तेलींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय केसरकरांना येत्या विधानसभा निवडणुकीत तेलींचे कडवे आव्हान असेल.