संसदेत धक्काबुक्की, राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळे भाजपा खासदार जखमी? रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

केंद्रीय मंत्री अमित शाह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा खासदारांनी काँग्रेसनेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच म्हणत संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा आरोप प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

नव्या संसदेच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपाच्या काही खासदारांनी मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याची चर्चा आहे.

राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलो आणि मी जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा सारंगी यांनी आरोप केला आहे. दरम्यान, प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.