Uttrakhand Tunnel Collapsed: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एका मोठ्या अपघाताचे वृत्त समोर येत आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा-दांदलगाव दरम्यान निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. हा निर्माणाधीन बोगदा सिल्क्यराहून 150 मीटर पुढे तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात बोगद्यात मोठ्या प्रमाणात कामगार अडकल्याची माहिती आहे.
बचाव कार्य सुरू
उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळण्याच्या या दुर्घटनेवर उत्तराखंडच्या डीजीपींचे वक्तव्यही समोर आले आहे. बोगद्यात कामगार अडकल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
40 मजूर अडकले
रविवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. हा निर्माणाधीन बोगदा सुमारे 4 किलोमीटर लांबीचा होता, त्यातील सुमारे 150 मीटर तुटला होता. पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सुमारे 40 मजूर अडकल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत व बचाव कार्य हाती घेतले.
#WATCH | Uttarakhand: A part of the tunnel under construction from Silkyara to Dandalgaon in Uttarkashi, collapsed. DM and SP of Uttarkashi district are present at the spot. SDRF, and Police Revenue teams are also present at the spot for relief work. Rescue operations underway. pic.twitter.com/hxrGqxWrsO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2023
बोगद्यातील अपघातापासून लोकांना वाचवण्यासाठी पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, आपत्कालीन 108 आणि बोगदा बांधणारी संस्था NHIDCL चे कर्मचारीही घटनास्थळी हजर आहेत. प्रत्येकजण बोगदा उघडण्यासाठी काम करत आहे. या बोगद्याच्या मदतीने उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास 26 किलोमीटरने कमी होणार आहे.
पाईपद्वारे मजुरांना ऑक्सिजन दिला जात आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन पाईपद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. सिल्कियराच्या दिशेने बोगद्याच्या आत 200 मीटर अंतरावर दरड कोसळली आहे. अपघात झाला त्यावेळी मजूर काम करत होते. ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत नवयुगा कंपनी सिल्क्यरा ते दंडलगाव या बोगद्याची लांबी 4.5 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात आला आहे. यापूर्वी बोगद्याचे काम सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र आता ते मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हे अंतर 26 किलोमीटरने कमी होणार आहे.
#WATCH | Uttarakhand: Latest visuals of rescue operations that are underway after part of the tunnel under construction from Silkyara to Dandalgaon in Uttarkashi, collapsed.
Uttarkashi SP Arpan Yaduvanshi says, “In Silkyara Tunnel, a part of the tunnel has broken about 200… pic.twitter.com/9oURMxk0Dq
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2023
याआधी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातही तपोवन बोगदा कोसळला होता. हा अपघात 2021 मध्ये झाला होता. बोगद्यात कामगार अडकले होते. बोगद्यातील मलबा हटवण्यासाठी जेसीबी आणि डंपर तैनात करण्यात आले होते, मात्र अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतरही यश आले नाही. यानंतर बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ड्रिलिंग करण्यात आले, मात्र कामगारांना वाचवण्यात विलंब झाला. या अपघातात सुमारे 53 मजुरांना आपला जीव गमवावा लागला.
IND vs NZ Semi Final: …तर भारत थेट World Cup 2023च्या फायलनमध्ये पोहोचणार!