IND vs NZ Semi Final: …तर भारत थेट World Cup 2023च्या फायलनमध्ये पोहोचणार!

0
WhatsApp Group

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याचवेळी, विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या संदर्भात आयसीसीचा एक नियम भारतासाठी खूप फायदेशीर ठरत आहे. अशा स्थितीत समीकरण असे राहिले तर भारताला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी 

आयसीसी विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला याचा मोठा फायदा होऊ शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हर होईल किंवा कोणत्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल? असा विचार तुम्ही केला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

‘…तर भारत थेट फायनलमध्ये’

आयसीसीच्या नियमानुसार दोन संघांमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात, विश्वचषकातील गुणतालिकेत जो संघ अव्वल असेल, तो सामना अनिर्णित राहिल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. गुणतालिकेत भारत सध्या अव्वल आहे, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिल्यास भारताला सुपर ओव्हर खेळण्याची गरज भासणार नाही, भारतीय संघाला उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळेल. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेलाही या नियमाचा फायदा होणार आहे, कारण गुणतालिकेत ते ऑस्ट्रेलियाच्याही वर आहे.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा ऑफ शोल्डर ड्रेस चर्चेत, फोटो पाहून फुटेल घाम