Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महिलांसाठी महत्त्वाची बातमी…’या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हफ्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय? आणि किती रूपये जमा होणार आहेत? जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे.
लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात राज्य सरकारने केली. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.
किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 रूपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलीय. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता, त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.
‘या’ तारखेला पैसे येणार?
समोर माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे.