IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या रंगणार क्रिकेटचा सामना! जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
IND vs PAK: नुकताच 2023 च्या विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला. क्रिकेट चाहत्यांना लवकरच या दोन देशांच्या संघांमधील आणखी एक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 स्टेडियमवर होणार आहे. ही स्पर्धा 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. तर अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अंडर-19 आशिया कप 2023 8 संघांमध्ये खेळला जात आहे. पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांना अ गटात ठेवण्यात आले आहे तर ब गटात श्रीलंका, जपान, यूएई आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
टीम इंडियाने पहिला सामना जिंकला
भारतीय अंडर-19 संघाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तान अंडर-19 संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 173 धावांवरच गारद झाला. 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय अंडर-19 संघाने 7 विकेट्स राखून सामना जिंकला.
#TeamIndia off to a winning start in the #ACCMensU19AsiaCup 🙌🙌
They beat Afghanistan by 7 wickets at the ICC Academy Ground in Dubai 👌👌
Scorecard: https://t.co/4FgkV7W5HW pic.twitter.com/lXrAPruQlM
— BCCI (@BCCI) December 8, 2023
सामना कधी आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंडर-19 आशिया चषक सामना 10 डिसेंबर रोजी ICC अकादमी ओव्हल 1, दुबई येथे सकाळी 11 वाजता सुरू होईल.
सामना कुठे पहायचा?
आशिया चषक अंडर-19 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
हेही वाचा – IND vs SA: मोठा धक्का! ‘हा’ खतरनाक खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर!
अंडर-19 आशिया कपसाठी दोन्ही संघांचे संघ
भारत: अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी
पाकिस्तान: मिर्झा साद बेग (कर्णधार), अहमद हुसेन, अली अस्फंद, अमीर हसन, अराफत अहमद मिन्हास, अजान अवेस, खुबैब खलील, नजाब खान, नावेद अहमद खान, उबेद शाह, मुहम्मद रियाजुल्ला, मुहम्मद तय्यब आरिफ, मुहम्मद झीशान, शाहजेब खान , शमील हुसेन.