IND vs SA: मोठा धक्का! ‘हा’ खतरनाक खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना डर्बनच्या मैदानावर होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे.

WhatsApp Group

India vs South Africa: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून तिथे यजमान संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात 19 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होईल, त्यातील पहिला सामना डर्बनच्या मैदानावर खेळवला जाईल. या मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. आता वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीच्या रूपाने यजमान संघाला मोठा फटका बसला आहे, जो संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. ही माहिती शेअर करण्यासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने बदली खेळाडूचे नावही जाहीर केले आहे.

पायाच्या दुखापतीमुळे एनगिडी बाहेर

एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान लुंगी एनगिडीला पायाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्य सामनाही खेळू शकला नाही. टी-20 मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी प्रत्येकाची अपेक्षा होती पण तो तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. आता या टी-20 मालिकेत एनगिडीच्या जागी त्याचा बदली खेळाडू म्हणून ब्युरॉन हेंड्रिक्सचा समावेश करण्यात आला आहे. हेंड्रिक्सने दोन वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. अशा परिस्थितीत एनगिडीची दुखापत त्यांच्यासाठी गंभीर चिंतेची बाब ठरू शकते. एनगिडीला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही हे स्पष्ट होईल.

तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत 6 डिसेंबरच्या सकाळी डर्बनला पोहोचला, जिथे संघाचे पहिले सराव सत्र 8 डिसेंबर रोजी झाले. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारेल, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची मायदेशात टी-20 मालिका 4-1 ने जिंकली.

Pakistan vs Prime Minister’s XI: हे कसं शक्य आहे? नो बॉल नाही, तरीही 1 चेंडूत केल्या 7 धावा, पाहा VIDEO

दक्षिण आफ्रिकेचा संघ

एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हॉन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक केन्स्लास, हेन्रिक महाराज , डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.