IND vs AUS: विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात, ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी पराभव

ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 च्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने अवघ्या 2 षटकात 3 विकेट गमावल्या होत्या, पण तिथून टीम इंडियाच्या विजयाची शक्यता कमी दिसत होती, पण विराट कोहली आणि केएल राहुलने टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची एकापाठोपाठ एक अशी पडझड झाली की, टीम इंडियाचे तीन फलंदाज खाते न उघडताच शून्यावर बाद झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतले. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर भारत सामना हरेल असं वाटतं होतं मात्र यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळली आणि कमालीचा संयम दाखवला.
दोन्ही फलंदाजांमध्ये 165 धावांची भागीदारी झाली, ज्याने टीम इंडियाला विजयाच्या मार्गावर नेले. विराट-केएल विजय मिळवूनच परततील, असे वाटत होते, पण त्यानंतर जोश हेझलवूडने विराटला 85 (116) धावांवर बाद करून भारताला चौथा धक्का दिला. पण, केएल राहुल क्रीजवर ठाम राहिला आणि त्याने हार्दिकसह टीम इंडियाला विजयाच्या पलीकडे नेले. भारताने हा सामना 6 विकेटने जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली. या विजयासह भारताचे 2 गुण झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाने 200 धावांचे लक्ष्य दिले होते
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या फलकावर लावण्यात अपयश आले. आणि 199 च्या स्कोअरवर ऑलआऊट झाला. बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. पण यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात ६९ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. पण ही भागीदारी मोडीत काढत कुलदीप यादवने 41(52) धावांवर खेळत असलेल्या वॉर्नरला पायचीत केले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ 46(71) धावांवर रवींद्र जडेजाचा बळी ठरला.
View this post on Instagram
कांगारू संघाला मार्नस लॅबुशेनकडून अपेक्षा होत्या, पण जडेजाने 27 (41) धावा पूर्ण केल्या आणि त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ग्लेन मॅक्सवेल 15(25) आणि कॅमेरॉन ग्रीन 8(20) धावांवर बाद झाले. कर्णधार पॅट कमिन्स 15 (24) धावांवर बुमराहचा बळी ठरला. अॅडम झाम्पा 6(20) आणि मिचेल स्टार्क 28 (35) धावा करून बाद झाला. अशाप्रकारे संपूर्ण कांगारू संघ 49.3 षटकांत 199 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले. भारत हे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते, मात्र मिचेल स्टार्कने इशान किशनला शून्यावर बाद केले. यानंतर रोहित शर्माही शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितपाठोपाठ श्रेयस अय्यरही शून्यावर आऊट झाला. टीम इंडियाला येथून विजय मिळवणे कठीण दिसत आहे. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली आणि केएल राहुलने भारतीय संघाची कमान आपल्या खांद्यावर घेतली आणि शतकी भागीदारी करत सामना संघाच्या नावावर केला.
World Cup 2023: धोनी आणि द्रविडसारख्या दिग्गजांना मागे टाकत रोहितने केला ‘हा’ अनोखा विक्रम