
ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 च्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने अवघ्या 2 षटकात 3 विकेट गमावल्या होत्या, पण तिथून टीम इंडियाच्या विजयाची शक्यता कमी दिसत होती, पण विराट कोहली आणि केएल राहुलने टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितचा कर्णधार म्हणून विश्वचषकातील हा पहिलाच सामना होता. या सामन्यात नाणेफेकसाठी बाहेर पडताच रोहितने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदभार स्वीकारताच रोहित शर्मा विश्वचषक इतिहासातील सर्वात वयस्कर कर्णधार बनला आहे. रोहितचे वय सध्या 36 वर्षे 161 दिवस आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकले आहे. 1999 च्या विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या अझरुद्दीन यांचे वय 36 वर्षे 124 दिवस होते.
View this post on Instagram
विश्वचषक सामन्यातील भारतासाठी सर्वात वयस्कर कर्णधार
- 36 वर्षे 161 दिवस- रोहित शर्मा (2023)
- 36 वर्षे 124 दिवस- मोहम्मद अझरुद्दीन (1999)
- 34 वर्षे 71 दिवस – राहुल द्रविड (2007)
- 34 वर्षे 56दिवस- एस वेंकटराघवन (1979)
- 33 वर्षे 262 दिवस- एमएस धोनी (2015)
खेळाडू म्हणून दोन विश्वचषक खेळले
रोहित शर्माने यापूर्वी टीम इंडियासाठी खेळाडू म्हणून दोन विश्वचषक खेळले आहेत. 2011 च्या विश्वचषकात रोहितला संघात स्थान मिळू शकले नाही. पण यानंतर हा खेळाडू 2015 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. दोन्ही वेळा टीम इंडिया उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली. विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा (648) करणारा फलंदाज रोहित होता.