राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा केलेला आहे अनेक महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता पण महाराष्ट्र सरकारने जमा केलेला आहे आणि अनेक महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ( Majhi Ladki Bahin Installment) मिळून 3000 हजार रुपये खात्यात 4 ऑक्टोंबर पासून जमा होत आहे.
परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असून सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी 4 बाबी आम्ही सांगणार आहोत या पूर्ण केल्यानंतर अशा सर्व महिलांना शंभर टक्के या योजनेचा पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
तात्काळ करा ही 4 काम करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही पण अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज तालुकास्तरीय समितीकडून मंजूर पण करण्यात आलेला आहे परंतु तुम्हाला आतापर्यंत या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी काही 4 गोष्टी घेऊन आलेलो आहोत ते पूर्ण केल्यानंतर महिलांना या योजनेचा लाभ अवश्य मिळेल त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
अर्ज मंजूर आहे की ते तपासून घ्या
जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रामध्ये व अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज केलेला आहात तर तो अर्ज मंजूर झाला का नाही हे तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट व पेंडिंग असल्यामुळे त्यांना या योजनेचे लाभ मिळाला नाही.
बँक खाते आधार लिंक आहे का नाही? ते तपासून घ्या
ज्या बँकेचे तुम्ही खाते दिली आहे त्या बँक शाखेमध्ये जाऊन ते खाते आधार लिंक आहे का नाही त्याची माहिती घ्यावी जर तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर ते बँक खाते तात्काळ आधार लिंक करून घ्यावी त्याचप्रमाणे तुमचे खाते ज्या ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जाऊन बॅलन्स इन्क्वारी करून घ्यावे आणि अनेकदा काय होते तुम्ही दिलेले बँकेत पैसे जमा न होता दुसऱ्या कोणत्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊन जातो.
आधार कार्ड अपडेट करून घ्यावे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज तुमचा मंजूर आहे व त्याचप्रमाणे तुमची बँक खाते आधार लिंक आहे यांची खात्री झाल्यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड जवळच्या आधार केंद्रांमध्ये भेट देऊन अपडेट करून घ्यावे आणि तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर पण जोडून घ्यावा.
आधार नंबर चुकला का हे तपासून घ्या
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना जर आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुमच्या अर्जामध्ये भरलेला आधार नंबर बरोबर आहे का नाही तपासून घ्यावे जर आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तर तात्काळ तुम्ही अंगणवाडी केंद्र किंवा महिला व बालकल्याण विभाग या कार्याला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.