‘मी राम मंदिर बॉम्बने उडवून देईन, मी दाऊदचा दहशतवादी आहे’… धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक

0
WhatsApp Group

अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या 21 वर्षीय मोहम्मद इंतेखाबला बिहारच्या अररिया पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने धमकी दिली होती की, मी दाऊद इब्राहिम टोळीचा दहशतवादी आहे, मी राम मंदिर बॉम्बने उडवून देईन… माझे नाव छोटा शकील आहे.

बिहारमधील अररिया जिल्ह्यात इंतेखाब आलम नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. त्याने 22 जानेवारी 2024 रोजी आयआरएस डायल 112 वर कॉल करून अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या दिवशी राम मंदिराचा अभिषेक होणार आहे.

हेही वाचा – जय श्री रामच्या घोषणांनी राहुल गांधी संतापले? व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून भाजप-काँग्रेसमध्ये युद्ध