जय श्री रामच्या घोषणांनी राहुल गांधी संतापले? व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून भाजप-काँग्रेसमध्ये युद्ध

0
WhatsApp Group

Rahul Gandhi Viral Video: आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात्रेदरम्यान त्यांच्या उपस्थितीत जय श्री रामचा नारा दिल्याने राहुल गांधींचा संयम सुटल्याचा दावा केला जात आहे.

काही भाजप कार्यकर्ते राहुल गांधींच्या बससमोर येऊन घोषणाबाजी करत असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे. राहुल गांधी बसने प्रवास करत होते. बस एका गावाजवळ आल्यावर तिथे भगवे गमछ घातलेल्या लोकांची गर्दी जमली. लोक जय श्री रामच्या घोषणा देऊ लागले. हे पाहताच राहुल गांधी बसमधून खाली उतरले आणि लोकांच्या गर्दीत पोहोचले. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

काँग्रेसच्या या दाव्यावर भाजपनेही पलटवार केला असून जय श्री राम आणि मोदी-मोदीच्या घोषणा ऐकून काँग्रेस नेते राहुल गांधी संतप्त झाल्याचे म्हटले आहे.