हार्दिक पांड्याच्या मोठ्या चुलत भावाला फसवणूक प्रकरणात मुंबईच्या इकॉनॉमिक ऑफिस विंगने अटक केली आहे. हार्दिक आणि क्रृणाल पांड्याला फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 4.3 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. हार्दिक आणि क्रृणालची फसवणूक केल्याप्रकरणी वैभव पांड्याला अटक करण्यात आलीय.
हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या आणि वैभव पांड्या तिघांनी मिळून एक कंपनी स्थापन केली होती. हार्दिक आणि क्रृणाला दोघांचे त्या कंपनीत 40 टक्के शेअर होते. वैभवचे 20 टक्के शेअर होते. आता वैभव पांड्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमरचा व्यवसाय सुरु केला. वैभवने नंतर स्वत:चाच पॉलिमरचा व्यवसाय सुरु केला. त्याने हार्दिक आणि क्रृणालला या बद्दल काही कळवलं नाही. पैशांच्या अफरातफरीसह नियमांच उल्लंघन केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
Avneet Kaur: अवनीत कौरचा बिकीनी अंदाज! चाहत्यांच्या हटेनात नजरा
हार्दिकचा सावत्र भाऊ वैभव पंड्या (37) याने मुंबईतील पार्टनरशिप फर्ममधून सुमारे 4.3 कोटी रुपयांची हेराफेरी केली आहे. यामुळे हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल यांचे नुकसान झाले, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.