Good news! दहावी बारावीचा पेपर लिहण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार जास्त वेळ

WhatsApp Group

इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. 10वी-12वी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यामुळे तुम्हाला परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. महाराष्ट्र मंडळाने ही माहिती देत ​​परिपत्रक जारी केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने मुलांचे पालक या परीक्षांकडे पूर्ण लक्ष देतात. मात्र प्रश्नपत्रिका मोबाईल फोन आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याच्या अफवा आणि अशा काही घटना पाहायला मिळाल्या आहेत.

सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेपासून परीक्षेच्या नियोजित वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाटण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

मात्र, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व पालक व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन, गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च 2024च्या परीक्षांसाठी दहा मिनिटांची वेळ वाढविण्यात येत आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का! संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीला ईडीचं समन्स