ठाकरे गटाला मोठा धक्का! संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीला ईडीचं समन्स

0
WhatsApp Group

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूरज चव्हाणच्या अटकेप्रकरणी संदीप राऊत यांचीही चौकशी केली जाणार आहे. समन्समध्ये संदीप राऊत यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. याआधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांची चौकशी केली आहे.

सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन