गौतमी पाटीलला सिंधुदुर्गात “नो एंट्री”, कुडाळमधील कार्यक्रम रद्द

0
WhatsApp Group

Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत असते. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत होती. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते.

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सिंधुदुर्गातही होणार होता. मात्र तिच्या कार्यक्रमाला येथे विरोध करण्यात आला आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिच्यावर टीका करत होते. सुसंस्कृत अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौतमी पाटीलचा डान्स कोकणात होता नये अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. अखेर गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Gautami Patil: कोण आहे गौतमी पाटील? जाणून घ्या

8 ऑक्टोबरला कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सकाळी 11 तर कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे सायं. 5 तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “गौतमी पाटील डीजे डान्स शो” हा कार्यक्रम होणार होता. मात्र कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.